ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरने सुरू आहे, हे टँकर महापालिका पाणीपुरवठा योजनेच्या वसंत टेकडी येथील टाकीतून भरून घेतले जातात, त्यामुळे शहराला पाणी कमी पडत असून नागरिकांनी मिळणारे पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौर शीला शिंदे यांनी केले आहे.
शहरात अनेक ठिकाणी नळांना तोटय़ा बसवलेल्या नाहीत, तसेच पाणी आले की अनेकजण नळाला विद्युत पंप लावून पाण्याचा उपसा करतात. अशा सर्वावर मनपाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे नळांना तोटय़ा बसवून घ्याव्यात तसेच नळांना विद्युतपंप लावू नयेत असेही महापौरांनी म्हटले आहे. आपल्या परिसरात कुठेही मनपाच्या जलवाहिन्यांची गळती होत असेल तर लगेचच पाणीपुरवठा कार्यालयात २३४६०१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापौरांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा