कामगारांचे वेतन करतांना महापालिकेची सतत होणारी दमछाक, विकासासाठी असलेला अपुरा निधी अशा संकटांवर मात करीत परभणीचे पहिले-वहिले महापौर प्रताप देशमुख यांनी कारकीर्दीचे एक वर्ष शुक्रवारी पूर्ण केले. भविष्यात जनतेची अपेक्षापूर्ती करण्यासाठी त्यांना विकास कामांच्या माध्यमातून धडाकेबाज पावले टाकावी लागणार आहेत.
सुरुवातीची अडथळ्यांची शर्यत पार करुन आता महापालिकेची घडी नीटपणे बसू लागल्याने जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. आपल्या कारकिर्दीचा ठसा शहरावर उमटविण्यासाठी महापौरांना आता अधिक गतीने आण् िधडाडीने काम करावे लागेल. विरोधी पक्षांसह समन्वय साधण्याचे कसब त्यांच्याकडे आहेच. भविष्यात शहराच्या विकासाला बळकटी देणारे प्रकल्प सिद्धीस जावेत अशी आखणी त्यांना पुढील काळासाठी करावी लागणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या अनेक मोठय़ा शहरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तुलनेने परभणीत पाणीटंचाईवर मात करण्यात महापालिकेला काही अंशी यश आले. यंदा टंचाईची झळ परभणीकरांना तीव्रपणे जाणवली नाही. मात्र, शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणे तसेच वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम तडीस नेणे हे महापौरांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. शहरातल्या पथदिव्यांची व्यवस्था खाजगी कंपनीकडे सोपवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर देशमुख यांच्या काळात झाला, अर्थात या संदर्भातल्या जनतेच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. शहरात आज अनेक प्रभागात घंटागाडय़ाद्वारे कचरा संकलीत होत असला तरी त्याचे पूर्णपणे व्यवस्थापन करणे अजूनही शक्य झाले नाही. अशा उपक्रमात शहरवासीयांचीही मदत अपेक्षीत आहे. जलपुर्नभरण सारखे उपक्रम जलमित्र संघटनेच्या सहकार्याने राबविण्याचे प्रयत्न झाले. शहरात जाणिवजागृतीही झाली. आता आणखी पंधरवाडय़ानंतर जेव्हा पावसाला सुरूवात होईल तेव्हा शहरवासीयांनी या पुनर्भरणसारख्या उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे.
शहरातल्या उद्यानांमध्ये महापालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे. वयोवृद्ध नागरीक आणि लहान मुले यांच्यासाठी उद्यानांचे रुप पालटले पाहिजे. भविष्यात महापौरांचे अनेक संकल्प आहेत. नुकताच महापालिकेला विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे. जोवर निधीचा अभाव असेल तोवर कोणतीच विकास कामे हाती घेता येत नाहीत. सर्व सोंगे आणता येतात पण पशाचे सोंग आणता येत नाही अशी म्हण आहे. सुरूवातीच्या काळात इरादे कितीही असले तरीही निधीचा अभाव असल्याने भरीव विकासकामे झाली नाहीत. आता मात्र निधी प्राप्त झाल्याने नजीकच्या काळात शहरात विकासकामांचा धडाका दिसून यावा, अशी अपेक्षा चूक कशी असेल ?
स्थानिक संस्था कराचा तिढा सोडवताना हा कर वसूल करणे, विविध ठिकाणी आखलेली व्यापारी संकुले पुर्ण करणे, नाटय़गृहाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णवाहिका व शववाहिन्यांची उपलब्धता अशा काही कामांवर भविष्यात लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. ही कामे नजीकच्या काळात मार्गी लागणे महत्वाचे आहे. नियोजन आणि आखणी तसेच सर्वाशी समन्वय या बाबींमध्ये वर्षभराचा कालावधी गेला असला तरीही पुढील काळात जोमदारपणे विकासकामे पार पडली तर शहराचा कायापालट होवू शकेल.
अडथळयांच्या शर्यतीत महापौर पदाची वर्षपूर्ती
कामगारांचे वेतन करतांना महापालिकेची सतत होणारी दमछाक, विकासासाठी असलेला अपुरा निधी अशा संकटांवर मात करीत परभणीचे पहिले-वहिले महापौर प्रताप देशमुख यांनी कारकीर्दीचे एक वर्ष शुक्रवारी पूर्ण केले.
First published on: 20-05-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor completed his first year thou in hurdle competition