रोख रक्कम पालिकेच्या ‘तिजोरीत’!
कल्याण डोंबिवली महापालिकेने महापौर कबड्डी चषक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी मांडव व इतर खर्चासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च करण्यात आला. पण कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना घटनास्थळी पारितोषिकाची रोख रक्कम किंवा धनादेश देण्याऐवजी त्यांची महापौर चषकावरच बोळवण करण्यात आल्याने विजेत्या संघांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्यात कल्याणमधील गायत्री शाळेसमोरील क्रीडांगणावर या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. ठाणे जिह्य़ातील अनेक कबड्डी संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना २५ हजार, १५ हजार, १० हजार, चार हजार अशी रोख पारितोषिके देण्याचे ठरले होते. या स्पर्धेत ठाण्यातील श्री माऊली मित्र मंडळ, वडूनवघर येथील आकाश मित्र मंडळ, महिला गटात ठाण्यातील शिवतीर्थ कबड्डी संघ विजयी ठरला. विजेत्या संघांना एकाच वेळी पारितोषिकाची रक्कम व चषक मिळाला तर होणारा आनंद सर्वाधिक असतो. या विजेत्या संघांना केवळ चषक दिले गेले. पारितोषिकाची रक्कम नंतर देण्यात येईल असे सांगून बोळवण करण्यात आली. याविषयी विजेत्या संघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदारांची देयके तात्काळ काढणाऱ्या पालिकेला क्रीडाविषयक किती प्रेम आहे हे यानिमित्ताने कळले, अशी टीका क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.
महापौर कबड्डी चषक विजेत्यांची पालिकेकडून चषकावरच बोळवण
रोख रक्कम पालिकेच्या ‘तिजोरीत’! कल्याण डोंबिवली महापालिकेने महापौर कबड्डी चषक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी मांडव व इतर खर्चासाठी सुमारे पाच लाखांचा खर्च करण्यात आला. पण
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2013 at 02:31 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor kabbadi competition winners not get the winning prize