महापौर कला ओझा यांच्या दालनातील अडगळीचे साहित्य उचलून नेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र मनपा कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण विभागाच्या गाडीतून नेले. मात्र, त्यामुळे महापालिकेत मंगळवारी एकच गदारोळ झाला. या विषयावर खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात महापौर ओझा यांना जाब विचारण्यात आला. या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीची माफी मागितली. कर्मचाऱ्यांकडून चूक झाली आहे. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यामुळे घडलेल्या घटनेबद्दल ‘माफी’ असावी, असे त्या म्हणाल्या.
सोमवारी दुपारी महापौरांच्या दालनातील अडगळीचे सामान काढण्यात येत होते. टेबल, खुर्ची काढल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्रही काढण्यात आले. जी व्यक्ती अतिक्रमण पथकाच्या गाडीत बसली होती, तो कर्मचारी ते छायाचित्र मांडीवर घेऊन बसणार होता. अवमान करण्याचा कोणताही उद्देश नव्हता.
जेव्हा अडगळीचे सामान नेले जात होते, तेव्हा मी दालनात नव्हते, असेही महापौर ओझा म्हणाल्या. महापालिकेत या विषयावरील बैठकीस उपस्थित असणारे खासदार खैरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांची भेट टाळली.

Story img Loader