कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे  वडाळा येथील पालिकेच्या इमारतीमध्ये सज्जा कोसळून मृत्युमुखी पडलेल्या आठ वर्षांच्या मुलाच्या नातेवाईकांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी दिले.
या इमारतीची दुरुस्ती सुरू होती. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळून मासूम खत्री हा मुलगा मृत्युमुखी पडला. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी पालिका सभागृहात उमटले. मासूमच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसानभरपाई द्या, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नगरसेवक याकूब मेमन यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर सुनील प्रभू यांनी खत्री कुटुंबियांना कंत्राटदाराकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, असे आदेश दिले. दरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. तेथेही सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे खोदकाम झालेल्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची सविस्तर अहवाल सभागृहाला सादर करावा, असा आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा