एमबीए या दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र स्तरावर सामाईक प्रवेश परीक्षा घेणार असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने १५ व १६ मार्चला होणार आहे.
याबाबतची संपूर्ण माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळानुसार १४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल व विलंब शुल्कासह १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी व फार्म भरता येईल.
परीक्षेला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना ४ मार्चपासून प्रवेश पत्र देण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल २१ एप्रिलला सांयकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील व अपंग विद्यार्थ्यांकरिता ८०० रुपये प्रवेश परीक्षा शुल्क आकारण्यात येतील. इतर माहितीकरिता पडोली येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅड रिसर्च महाविद्यालयाशी संपर्क करावा.
एमबीएची सामाईक प्रवेश परीक्षा १५ मार्चपासून
एमबीए या दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र स्तरावर सामाईक प्रवेश परीक्षा घेणार
First published on: 31-01-2014 at 08:31 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba common admission test from march