स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवाजी सानप व जळगावचे डॉ. राहुल कोल्हे यांचा प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान कायद्यातील तरतुदीनुसार दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने निलंबित केले आहेत.
बिंदुसरा नदीपात्रात सापडलेल्या अर्भकप्रकरणी डॉ. सानपविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
सध्या ते नाशिक कारागृहात आहेत.
 परळीतील डॉ. सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयात गर्भपात करताना मृत झालेल्या विजयमाला पट्टेकर या महिलेच्या गुन्ह्य़ात जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हे यांचा संबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
या प्रकरणाचा अहवाल महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे गेल्यानंतर डॉ. कोल्हे यांचाही वैद्यकीय व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.