इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंबरनाथ-बदलापूर शाखेच्या वतीने रविवार १७ फेब्रुवारी रोजी सूर्योदय सभागृह, साई विभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत विविध वैद्यकीय व्यावसायिक प्राथमिक तसेच अद्ययावत आरोग्य सुविधांविषयी व्याख्याने देणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेचे पुरस्कर्ते आणि वर्धा येथील सेवाग्राममधील कस्तुरबा रुग्णालयात ग्रामीण आरोग्य विमा योजना यशस्वीपणे राबविणारे डॉ. उल्हास जाजू या परिषदेत  सकाळी ११ वाजता ‘सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामस्वराज्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
याशिवाय डॉ. राकेश पटेल, डॉ. सुनील कवठे, डॉ. योगेश पालशेतकर, डॉ. विजय चिले, डॉ. अनुज भासीन, डॉ.बिजय कुट्टी, डॉ. प्रमोद जोग, डॉ. अजित वझे, डॉ. सुहास प्रभू, डॉ. कृष्णकुमार आणि डॉ. प्रतीक तांबे यांचीही दिवसभरात व्याख्याने होणार आहेत.