लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर हे अडीच कोटींचे यंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)च्या औषधशास्त्र विभागात लावण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयातील हे यंत्र राज्यातील पहिले यंत्र असून मनोविकारांसह आनुवंशिक विकृतीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा फायदा अद्ययावत उपचाराकरिता होणार आहे.
मेडिकलमध्ये १५० कोटींच्या पंतप्रधान सुरक्षा योजनेवर काम सुरू असून या योजनेंतर्गत मेडिकलच्या औषधशास्त्र विभागात लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर यंत्र लावण्यात आले आहे. रुग्णाच्या रक्तातील औषधांचे परिणाम या यंत्राने जाणता येणार असून एखाद्या औषधाचा फायदा होत नसेल तर ते तातडीने बदलणे शक्य होईल. या यंत्राने मिरगी, मनोविकारासह आनुवंशिक विकृतीवर तातडीने चांगला उपचार करता येईल. जे गरीब रुग्ण मेडिकलमध्ये येतात त्यांना या यंत्राचा फायदा मिळणार असल्याचे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी व्यक्त केले. विभागप्रमुख डॉ. ए. के. काळे यांनी सांगितले की, औषधांच्या रक्तातील प्रमाणांची चाचणी या लिक्विड क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर यंत्राद्वारे करण्यात येईल. हे यंत्र पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, नोडल अधिकारी डॉ. किशोर टावरी, डॉ. श्रीकांत मतकरी, डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. डाखळे, डॉ. सोनटक्के, डॉ. तुरणकर, मुख्य प्रशाकीय अधिकारी डॉ. परशुराम दोरवे, प्रशाकीय अधिकारी विलास खनगन, खडसे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा