महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या जिल्हा एसटी कामगार संघटनेचा मेळावा परवा (दि. १७) पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे राज्य सचिव अविनाश अभ्यंकर मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या पारनेर आगाराचे सचिव राम नानेकर यांनी ही माहिती दिली.
सोमवारी सकाळी ११ वाजता बेलकर मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे कार्याध्यक्ष विकास अकलेकर, उपाध्यक्ष सुभाष जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावडे, सचिव सुरेश चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत.
एसटीमधील मान्यताप्राप्त संघटना डोळे झाकून बसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारी झाल्याने काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. सन २०१२ ते १६ चा कामगार करार झालेला नाही, कामगारांचे भत्ते मिळत नाहीत, कामाचे तास वाढविण्यात आले आहेत, कनिष्ठ वेतनश्रेणीवर तीन हजार रूपयांत अनेक लोक काम करीत आहेत याविरूद्घ आवाज उठविण्यात येणार असल्याचे नानेकर यांनी सांगितले.

Story img Loader