शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरीकांच्या दुष्काळाबाबतच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उद्या (शनिवार) सबंधीत सर्व अधिकाऱ्यांच्या त्या, त्या ठिकाणी बैठका बोलावल्या आहेत.
सकाळी िपप्रीलौकाई, केलवड, दुपारी आडगाव खुर्द, आडगाव बुद्रुक, बेंडवस्ती, सायंकाळी लोणी खुर्द याप्रमाणे या बैठका होणार आहेत. प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनीही मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader