शहरात राबविण्यात आलेल्या २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पातील निकृष्ठ दर्जाच्या कामांविषयी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. तरी ही बैठक मुंबईत न घेता कोल्हापूरमध्ये घ्यावी, असे पत्रक कॉमन मॅनच्या वतीने बाबा इंदूलकर, जीवन कदम, काका पाटील, अमित अतिग्रे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूरवासियांनी गेल्या दीड वर्षांत रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाबाबत व टोल विरोधात प्रखर लढा उभा केला आहे. त्यामुळे आयआरबी कंपनी अस्वस्थ झाली असून ती चुकीची विधाने करू लागली आहे. तसेच आयआरबीने केलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट असून त्याची पाहणी टोलविरोधीकृती समितीबरोबर फिरून करावी. मुंबई येथे वातानुकूलित केबिनमध्ये बसून केलेला निर्णय कोल्हापूरवासिय कदापी मान्य करणार नाहीत. तरी ही बैठक कोल्हापूरमध्ये खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदारपी. एन. पाटील व टोलविरोधी कृती समितीच्या प्रमुखांच्या उपस्थित व्हावी, असे पत्रकात म्हटले आहे.
रस्ते विकास प्रकल्पातील कामांविषयी १ फेब्रुवारी रोजी बैठक
शहरात राबविण्यात आलेल्या २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पातील निकृष्ठ दर्जाच्या कामांविषयी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. तरी ही बैठक मुंबईत न घेता कोल्हापूरमध्ये घ्यावी, असे पत्रक कॉमन मॅनच्या वतीने बाबा इंदूलकर, जीवन कदम, काका पाटील, अमित अतिग्रे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
First published on: 28-01-2013 at 07:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting on 1 feb for road development project