राज्यातील यंत्रमाग कामगारांना साडेसहा लाख रुपये खर्चाची घरकुले केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून मिळावीत. तसेच यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची त्वरित स्थापना करून सूत विक्रीवर २ टक्के कर लावून ती रक्कम कल्याण मंडळाकडे जमा करावी. त्यातून कामगारांना सामाजिक सुविधा देण्यात याव्यात या मागणीसंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगार महासंघाच्या शिष्टमंडळास दिली.    
सिटूप्रणीत यंत्रमाग कामगार महासंघाचे शिष्टमंडळ माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली कामगारमंत्री मुश्रीफ यांना भेटले. या वेळी मंत्र्यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले.    
या वेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची दोन महिन्यांत फेररचना करावी, आठ तास काम आणि दहा हजार रुपये पगार मिळावा, ओव्हर टाइमला दुप्पट पगार, भविष्यनिर्वाह निधी, विमा, बोनस, पेशन्स तसेच सामाजिक सुरक्षा कायदा करावा, कामगार अधिकारी कार्यालयाकडील रिक्त पदे त्वरित भरावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.     दरम्यान, यंत्रमाग कामगार महासंघाच्या वतीने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावर कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये इचलकरंजी, भिवंडी, सोलापूर, मालेगाव येथील कामगार सहभागी झाले होते. मोर्चा आझाद मैदानात गेल्यानंतर मोर्चासमोर कॉ. नरसय्या आडम, कॉ. दत्ता माने, भरमा कांबळे, ए. बी. पाटील, व्यंकटेश कोंगार आदींची भाषणे झाली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऱ्यां

ऱ्यां