बारी समाजाच्या वतीने ९ व १० फेब्रुवारीला उपवर युवक-युवती परिचय मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा   विठ्ठलनगरातील ‘अमृतवेल’मध्ये आयोजित करण्यात आला आहे. बारी समाजातर्फे शनिवारी उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता सुधाकर फुसे यांच्या हस्ते व नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी दीपक धुरडे व गुलाबराव सुने प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी द्वितीय सत्रात दुपारी ३ वाजता ज्येष्ठ नागरिक अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे उद्घाटन एस.एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी गणपतराव राऊत राहतील. सायंकालीन सत्रात सायंकाळी ५ वाजता मातृसत्कार सोहळ्याचे उद्घाटन निर्मला भोपळे करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसुम तायडे राहतील.
१० फेब्रुवारीला स्नेह मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता शालिनी माकोडे यांच्या हस्ते करण्यात येईल. पुंडलिकराव केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, दीप सजावट स्पर्धा, नृत्यकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांसह बाल आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.
द्वितीय सत्रात दुपारी २ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत समारोहाचे उद्घाटन महापौर अनिल सोले यांच्या हस्ते व आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार असून प्रकाश बोखड, सुधाकर कोहळे, सुनील तोटे, मारोतराव इंगोले, प्रकाश भुक्ते व राघवेंद्र चौरसिया यावेळी उपस्थित राहतील.