स्थानिक संस्था कराविरुद्ध व्यापाऱ्यांनी, तर विदेशी गुंतवणुकीविरुद्ध औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या ‘बंद’ ला परभणीत चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांना निवेदन दिले.
परभणी शहरातील एलबीटीचा तिढा गेल्या नोव्हेंबरपासून चालू आहे. एलबीटीचे सुधारित दर लागू करावेत, या मागणीसाठी डिसेंबरमध्ये व्यापाऱ्यांनी ५ दिवस बंद केला होता. महापालिकेनेही एलबीटीचे दर कमी करण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. महापालिकेने सुचविलेल्या कर सुधारणांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आजपर्यंत कुठलेही उत्तर आले नाही. त्यामुळे शासन नियमाप्रमाणेच महापालिका एलबीटीची वसुली करीत आहे. परभणीच्या व्यापाऱ्यांना ते मान्य नाही.
महापालिकेने केलेल्या ठरावाप्रमाणे वस्तूंवर कर आकारावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगानेच शुक्रवारी व्यापाऱ्यांनी ‘बंद’ पाळला. कापड, किराणा, अ‍ॅटोमोबाईल्स आदी व्यापारी यात सहभागी झाले. स्टेशन रस्त्यापासून शिवाजी चौक, कच्छीबाजार, वसमत रस्ता आदी भागातील दुकाने बंद होती. पालकमंत्री प्रकाश सोळंके यांची व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा