एमएमआरडीएला साक्षात्कार
ठाण्याच्या आसपास झपाटय़ाने विकसित होणाऱ्या शहरी पट्टयासाठी वाहतुकीची सक्षम व्यवस्था उभी राहावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पाच वर्षांपूर्वी आखलेला ठाणे-भिवंडी-कल्याण या सुमारे २३ किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित मोनो मार्गाऐवजी पुढील दहा वर्षांसाठी या मार्गावर सार्वजनीक बस वाहतुकीची व्यवस्था उभी करावी, अशा स्वरूपाचा अहवाल मेसर्स राइटस् लिमिटेड या सल्लागार कंपनीने एमएमआरडीएला सादर केला आहे. या अहवालामुळे नियोजित मोनो रेल्वेचा प्रकल्पही गुंडाळला जाण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा असून दीर्घकालीन नियोजनाच्या बाता मारणाऱ्या एमएमआरडीएने बस वाहतुकीचा पर्याय पुढे करून या भागातील स्थानिक प्राधिकरणांना एकप्रकारे धक्का दिला आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांचे झपाटय़ाने होणारे नागरीकीकरण लक्षात घेऊन एमएमआरडीएने २००८ मध्ये या मार्गावर मोनो रेल्वे उभारण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. यासाठी मेसर्स राइटस् लिमिटेड या दिल्लीस्थित एका कंपनीस सर्वेक्षणासाठी नेमण्यात आले. या कंपनीने या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार केला. त्यामध्ये २३ किलोमीटर अंतराचा मोनो रेल्वे प्रकल्प आखण्यात आला. या प्रकल्पात एकूण १७ स्थानकांचे गाजरही येथील रहिवाशांना दाखविण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे गणित मांडण्यात आले. तब्बल पाच वर्षांच्या अभ्यासानंतर हा खर्च करणे शक्य नसल्याचे एमएमआरडीएचे मत बनले असून या मार्गावरील प्रवासी क्षमता पाहाता मोनो रेल प्रकल्पाची या भागात आवश्यकता नाही, असे ठरविण्यात आले आहे. पुढील १० वर्षांसाठी याठिकाणी मोनो ऐवजी स्थानिक बससेवेला प्राधान्य द्या, असा पर्याय मेसर्स राइटस् लिमिटेड या सल्लागार कंपनीने सुचविला आहे. त्यानंतरच्या काळात या भागात मोनोसारखा प्रकल्प उभा करण्याविषयी विचार होऊ शकतो, अशी चर्चा सध्या एमएमआरडीएच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
मोनोचा नाद सोडा.. गडय़ा आपली बस बरी
ठाण्याच्या आसपास झपाटय़ाने विकसित होणाऱ्या शहरी पट्टयासाठी वाहतुकीची सक्षम व्यवस्था उभी राहावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पाच वर्षांपूर्वी आखलेला ठाणे-भिवंडी-कल्याण या सुमारे २३ किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित मोनो मार्गाऐवजी पुढील दहा वर्षांसाठी या मार्गावर सार्वजनीक बस
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-03-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messrs rights limited suggest mmrda to starts new buses not focus on monorail