जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा म्हाडा प्रकल्पात समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून वृत्तपत्र विक्रेत्यांना अल्पदरात घरकुल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन म्हाडाचे विभागीय सभापती नरेंद्र दराडे यांनी दिले.
विभागीय सभापतिपदी निवड झाल्याबद्दल दराडे यांचा नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना गृहप्रकल्पात सामावून घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. दराडे यांनी म्हाडा प्रकल्पात पत्रकारांना अडीच टक्के राखीव कोटा असून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी तसा प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्र्यांकडे देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष सुनील मगर, सरचिटणीस भारत माळवे, खजिनदार गौतम सोनवणे उपस्थित होते.

Story img Loader