नवी मुंबई व ठाणेच्या वेशीवर असणाऱ्या पटनी कंपनीामोरील एमआयडीसीच्या भूखंडावर खाडीच्या डबक्यामध्ये दरवर्षी किमान एक ते दोन जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू असण्याच्या घटना घडत आहे. या डबक्याचे कोणत्याही प्रकारे नियेाजन करून तलावही करण्यात येत नाही अथवा पाण्याचा डबका भराव टाकून बुझवण्यातही येत नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील तरुणांचे पाण्यामध्ये बुडून मृत्यू होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
भूमिपुत्रांच्या जमिनी एमआयडीसीने कवडीमोल भावाने विकत घेतल्या. त्या ठिकाणी डेब्रिजचा भराव ठाकून जमिनी सपाट करून करोडोच्या किमतीने भूखंड कंपन्याला विकले. पण एमआयडीसीने भूखंडावर डेब्रिज टाकून भूखंड सपाट करत असताना काही ठिकाणी दुजाभाव केला आहे. विटावा पेट्रोल पंपच्या बाजूला असणाऱ्या एमआयडीसीने भूखंड पटनी कंपनी, अ‍ॅक्सेस बॅक, नेव्हा कंपनी तसेच आदी कंपनीला विकले आहेत. पण एमआयडीसीच्या काही भूखंडावर पाण्याचे डबके तसेच ठेवले आहे. पटनी कंपनीसमोर असणाऱ्या एमआयडीसीच्या भूखंडावर पाण्याचा एक डबका तसाच ठेवण्यात आला आहे. या पाण्याच्या डबक्यामध्ये गाळ तसेच चिखल साचला आहे. तसेच या पाण्याच्या डबक्यामध्ये एका राजकीय नेत्याचे पाण्याचे टॅंकर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येतात. मात्र या भूखंडावर असणाऱ्या डबक्याच्या बाजूला संरक्षणासाठी कोणत्याही प्रकाराचे नियोजन केलेले नाही.
एमआयडीसीच्या या भूखंडावर गणपती पाडा, विटावा, कळवा, दिद्या, ऐरोली येथून मुले खेळण्यासाठी येतात. पण याच भूखंडावर असणाऱ्या पाण्याच्या डबक्यामध्ये कोणत्याही प्रकाराचे कुंपण, सुरक्षारक्षकचा बंदोबस्त अथवा पाण्यामध्ये उतरू नये असा फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेली मुले खेळून झाल्यांनतर पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरतात व पाण्यातील असणाऱ्या गाळामध्ये अडकून त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. हा भूखंड एमआयडीसी राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाडय़ाने देते. मात्र डबक्यामध्ये जाऊन तरुणाचा मृत्यू होत असल्यानेदेखील एमआयडीसी याकडे दुर्लक्ष करत आहे, असा अरोप नागरिकांकडून होत आहे.
एमआयडीसीच्या या भूखंडावरील न्यायालयामध्ये केस आहे. पण य भूखंडाचा भाग हा लॅन्ड सेक्शनकडे येत आहे. या संदर्भात एमआयडीसीच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात येऊन एमआयडीसीच्या भूखंडावरील पाण्याच्या डबक्याचे योग्य ते नियोजन करण्यात येईल.
-ए. व्ही. उमरगेकर, उपअभियंता,  एमआयडीसी

Story img Loader