विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात रोजगार निर्मितीचे मोठे केंद्र ठरणार असल्याचा गाजावाजा करण्यात आलेल्या मिहान प्रकल्पाने अद्याप टेकऑफ घेतलाच नाही. गेल्या एका दशकापासून कासव गतीने सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्टी मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अॅट नागपूर हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी २००२ मध्ये स्थापन केली. परंतु संरक्षण मंत्रालयाच्या जमीन हस्तातरणांचा तिढा न सुटल्याने मिहानसाठी आवश्यक दुसरी धावपट्टी अद्याप तयार झालेली नाही. या प्रकल्पाची मूळ कल्पना काबरे हब होती. त्यासाठी किमान दोन धावपट्टय़ा आवश्यक आहेत.
दुसरीकडे मिहानचा एक भाग असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात कंपन्यांनी फारसा रस दाखविलेला नाही. काही कंपन्यांनी जागा घेऊन ठेवली, पण प्रकल्प उभारले नाहीत आणि काही कंपन्यांनी प्रकल्प सुरू केले आणि अल्पावधीतच परवडत नाही म्हणून बंद केले. मिहानमधील सुमारे ३ हजार हेक्टर जमिनीचा अद्याप वापर झालेला नाही. यावर लॉजेस्टिक हब प्रस्तावित आहे. परंतु अजून ते सुरू झाले नाही.
एमएडीसीच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये पाच आयटी कंपन्याचे काम सुरू आहे. यात टाल कंपनीचे खऱ्या अर्थाने उत्पादन सुरू आहे. ही कंपनी विमानाचे सुटे भाग तयार करीत आहे. लुपीन या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने ट्रायल प्रॉडक्ट सुरू आहे. चार वर्षे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन केल्यानंतर प्रत्यक्षात या कंपनीचे औषध बाजारात येऊ शकेल. बोईंगचे देखील काम सुरू आहे. एक दोन महिन्यात त्यांचे काम पूर्ण होईल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.चे मुख्य अभियंता सुभाष चहांदे म्हणाले.

मूळ संकल्पना
मिहान हा देशातील पहिला असा प्रकल्प आहे की, ज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी आणि काबरे हब आहे. शिवाय विमातळाशेजारी बहुविध उत्पादन होणारे विशेष आर्थिक क्षेत्र आहे. मिहानमध्ये अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर लि.ने वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला होता. आता हा प्रकल्प बंद झाला आहे. डीएलएफ लि.ने देखील प्रकल्प सुरू केला आणि नंतर बंद केला.

आकार घेत असलेले प्रकल्प
बोईंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शापुरजी पालनर्जी अँड कंपनी लि., महिंद्रा सत्यम, महिंद्रा लाईफस्टाईल,
सुरू असलेले प्रकल्प
टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स लि., ल्युपिन फार्मा लि. कॅलिबर पाईंट बिझनेस सोल्युशन लि., डॉ.डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेस लि., भारत पेट्रोलिमयम कॉर्पोरेशन लि.

बुकींग करून ठेवणाऱ्या कंपन्या-
अबुंजा रिआलिटीज लि., एचसीएल टेक्नालॉजीस लि., हेक्सावेअर टेक्नालॉजी, इन्फोसिस लि., एल अँड टी इन्फोसिटी लि., मॅक्स एअरोस्पेश अँड एव्हिशन लि., आरएमझेड कॉर्पोरेशन, ताज सॅट्स कॅटरिंग लि., विपूल करमचंद ग्रुप आणि विप्रा.

अडथळे-
संरक्षण विभाग आणि एमएडसीच जमीन हस्तांतरणाचा तिढा न सुटलेला नाही.
कंपन्यांना माफक दरात वीज उपलब्ध नाही.
केंद्र सरकारने २०११-१२ मध्ये विशेष आर्थिक क्षेत्रातील कंपन्यावर किमान पर्यायी कर (एमएटी) लागू केला आहे.
सेझमधील उत्पादित माल विदेशात विकण्याची अट आणि तिकडे असलेली मंदी.