शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान नवीन नोदणी, दुरुस्ती, नाव वगळणे, इत्यादी संदर्भात मतदारयादीची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. घनसावंगीत पालकमंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे.
जिल्हय़ातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ८ हजार ४८७ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. परतूर ७ हजार २१२, जालना ७ हजार ६३५, बदनापूर ७ हजार ६९२ आणि भोकरदन ५ हजार ६०४ याप्रमाणे अन्य विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.
जिल्हय़ात नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये २२ हजार ८०७ पुरुष, तर १४ हजार ८२३ स्त्री मतदार आहेत. यासाठी जिल्हय़ातील १ हजार ५१४ केंद्रांवर प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली होती. जिल्हय़ाची सध्याची मतदारसंख्या १२ लाख ५१ हजार ६३६ एवढी झाली आहे. त्यामध्ये ६ लाख ५९ हजार ५२५ पुरुष आणि ५ लाख ९२ हजार १११ स्त्री मतदार आहेत.
प्रारंभी ऑक्टोबरअखेपर्यंत मतदार नोंदणी आणि दुरुस्तीबाबतची मुदत होती. परंतु नंतर ती २० नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली होती. अन्य जिल्हय़ांत स्थलांतरित आणि मृत झालेल्यांची नावे वगळण्यासाठी ४७९ अर्ज आले होते. चुकलेले नाव, चुकलेली जन्मतारीख, आडनावातील बदल इत्यादींच्या संदर्भात ५६२ अर्ज आले होते. बदललेल्या पत्त्याच्या दुरुस्तीसाठी २३८ अर्ज आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा