सायकलवरून चक्कर मारून आणण्याच्या नावाखाली साडेपंधरा वर्षीय मुलाने चार वर्षांच्या छोटय़ा मुलीवर बलात्कार केला. तालुक्यातील गोगलगाव येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला तिच्या आईला भेटण्यासाठी आपल्या चार वर्षांच्या मुलीसमवेत गोगलगाव येथे आली होती. तेथे तिची चार वर्षांची मुलगी खेळत होती. शेजारीच राहणा-या अल्पवयीन आरोपीने (वय साडेपंधरा वर्ष) या छोटय़ा मुलीला सायकलवर चक्कर मारण्याच्या नावाखाली स्वत:च्या घरी नेले. येथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच लहान मुलांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे. आरोपीही अल्पवयीन असून इयत्ता नववीत शिकत आहे. अत्याचारित मुलीवर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Story img Loader