विरोधी पक्षनेता व सभागृह नेत्याची निवड झाली नसल्याने मीरा-भाईंदर महापालिकेची पहिलीच महासभा गुरुवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. महापौर कॅटलीन परेरा यांनी आक्रमक पवित्रा घेत महासभेच्या कामकाजात सहभागी होणाऱ्या विरोधकांचा ‘ही महासभा अधिकृत का अनधिकृत?’ हा मुद्दा विषयाला धरून नसल्याने तो खोडून काढला. पहिल्याच महासभेचे कामकाज सुरू होत नाही, तोच भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेहता यांनी ‘सलग दोन महासभा न घेतल्याने महापौरांचे पद रद्द करणे तसेच ही महासभा अधिकृत का अनधिकृत?’ असा मुद्दा उपस्थित केला. परंतु हा मुद्दा विषयाला धरून नसल्याने महापौरांनी सभेचे कामकाज सुरू करण्यास सांगितले.