१. पुरी – ही दोन दिवसांची असताना विक्रमगड पोलीस ठाणे परिसरात बेवारस आढळून आली.
२. सायली – या एक महिन्याच्या मुलीला तिच्या आईने ठाण्यातील बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. हिची आई मनोरुग्ण असून ती ठाण्यातील मनोरुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.
३. सम्राज्ञी – या मुलीची आई २९ सप्टेंबर २०१४ रोजी प्रसूत होऊन या बाळाला तेथेच सोडून पळून गेली. कळवा पोलीस ठाण्यामार्फत तिच्या आईचा शोध सुरू आहे.
४. छकुली – ही चार वर्षांची मुलगी एन. आर. आय. पोलिसांना १२ सप्टेंबर २०१४ रोजी पाम बीच परिसरात मृत महिलेसोबत सापडली. तपासाअंती ही महिला या मुलीची आई असल्याचे निष्पन्न झाले.
५. ओंकार – हा मुलगा २९ ऑगस्ट २०१४ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस सापडला. या सर्व मुलांना ठाण्याच्या बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार विश्वबालक केंद्र, सेक्टर १२, नेरुळ, नवी मुंबई येथे संगोपनासाठी ठेवण्यात आले आहे. या मुलांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी संस्थेच्या पत्त्यावर किंवा २७७२०७६५/२७७०९०४९ या क्रमांकावर संपर्क साधवा.
महिमा – ही मुलगी २८ ऑक्टोबर २०१४ रोजी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आली. या मुलीला मुंबईच्या बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार इंडियन असोसिएशन फॉर प्रोमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शन अँड चाइल्ड वेल्फेअर (आयएपीए) या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी आयएपीए, फ्लॅट क्रं. ७, कॅनरा हाउस, मोगल लेन, माटुंगा (प.). येथे किंवा २४३०७०७६ किंवा २४३७४९३८.
इरफान – हा मुलगा सात महिन्यांचा असताना ७ नोव्हेंबर २०१४ रोजी माहिम पोलीस ठाण्यामार्फत व बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये श्रद्धानंद महिलाश्रम या संस्थेत दाखल करण्यात आला. या मुलाच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी श्रद्धानंद महिलाश्रम, महेश्वरी उद्यान, माटुंगा या पत्त्यावर किंवा २४०१०७१५/२४०१२५५२ या क्रमांकावर संपर्क साधवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा