प्रतिष्ठान अलायन्स प्रा. लि. कंपनीत २६ कोटी ९२ लाख ३३१ रुपयांची अफरातफर करून कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकरणात रघुवीर कुलकर्णी याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रघुवीर कुलकर्णी या कंपनीत रोखपाल म्हणून काम करत होता.
सी.ए. असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून रघुवीर कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, ऋती कुलकर्णी, भक्ती कुलकर्णी, राजेंद्र घोडके, विजयेंद्र डोके, वेणूधर कुलकर्णी व टी. एम. डोके यांनी संगनमत करून प्रतिष्ठान अलायन्स प्रा. लि. कंपनीत २६ कोटी ९२ लाख रुपयांची अफरातफर केली. या प्रकरणात राजाराम बाळकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिली. त्यांच्या खात्यातून तसेच त्यांची पत्नी व जावयाच्या संयुक्त खात्यातून अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक दराडे तपास करीत आहेत.
भूखंड प्रकरणी फसवणूक
शहरातील सिडको, एन-१२ भागात जमीन शिल्लक नसतानाही ६ जणांनी संगनमत करून १३ भूखंड विक्री प्रकरणात १ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार वीणा विश्वास बक्षी यांनी दिली. निवृत्ती जऱ्हाड, प्रकाश काकडे, शिवाजी बकाल, प्रभाकर बकाल, देविदास बकाल आणि कैलास बकाल या ६ जणांनी प्लॉट खरेदी-विक्रीत फसवणूक केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गट क्र. २५६ मध्ये जमीन शिल्लक नसतानाही ६०० स्क्वे. फुटाच्या १३ प्लॉटची परस्पर विक्री केल्याची तक्रार वीणा बक्षी यांनी सिडको पोलीस ठाण्यात केली. परस्पर प्लॉट विक्रीतून १ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा