राष्ट्रवादीचे नगरसेवक बबलू वाणी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी पुकारण्यात आलेल्या कोपरगाव बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद दुपापर्यंत पाळण्यात आला. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असे पोलीस निरीक्षक मधुकर औटे यांनी सांगितले.
रविवार असल्याने बहुतांशी दुकाने बंदच असतात. छोटीमोठी दुकाने सकाळपासून सुरू होती. बसस्थानक परिसर चालूच होता. पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. अनेकांनी दूरचित्रवाणीसमोर बसून चार राज्यांतील निकालाचा आनंद लुटला. शहर व तालुक्याच्या परिसरात थंडीची कालपासून लाट पसरली आहे. जेऊर कुंभारीच्या हवामान केंद्रावर ९ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे निरीक्षक पारवे यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक बबलू वाणी शिर्डी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Story img Loader