एरवी आपल्या ‘नंदिनी’ या नावाप्रमाणे कमालीच्या शांत, आनंदी, निरागस असणाऱ्या कॉंग्रेस आमदार नंदिनी पारवेकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था, रुग्णांची हेळसांड, परिसरातील अस्वच्छता आणि घाण पाहून अधिष्ठाता डॉ. डोंगरे यांच्या कक्षात प्रकट दुर्गावताराने महाविद्यालय प्रशासनाची अक्षरश पाचावर धारण बसवली. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सद्यस्थिती कथन केली.
आमदार नंदिनी पारवेकरांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांंसह वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाची पाहणी केली. रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन तक्रारी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, नंदिनी यांचे पती दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही नंदिनीच्या हस्ते पार पाडला. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.बागडे, डॉ.निलेश येलनारे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर, नगरपरिषद सभापती अमोल देशमुख, दत्ता कुळकर्णी, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण इत्यादी हजर होते. नंदिनी यांची कन्या मत्रेयी हिचा वाढदिवसही वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना फळवाटप करून साजरा करण्यात आला. लोकार्पण आणि वाढदिवसांचे सर्व औपचारिक कार्यक्रम शांतचित्ताने आटोपून नंदिनी यांनी महाविद्यालयातील भोंगळ कारभाराबद्दल दुर्गावतार दाखवत प्रशासनाची चांगली घाबरगुंडी उडवून दिली. नंदिनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून ‘ये क्या हो रहा है?’ ची माहिती दिली.
वैद्यकीय महाविद्यालयातील गरसोयी, अस्वच्छता, रुग्णांचे हाल, असामाजिक तत्वांचा िधगाणा इत्यादींच्या विरोधात गेल्या दहा वर्षांंपासून शिवसेना आमदार संजय राठोड हेच सातत्याने आंदोलन करीत आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ कार्यकत्रे असलेले शिवसनिक त्यांनी तनात केले आहेत. त्यांच्या मदतीला आता कॉंग्रेस आमदार नंदिनी पारवेकर यांनी येऊन सफाई मोहीम हाती घेतल्याचे चित्र जनतेने पाहिले आणि हे कार्य एका दिवसाचा ‘शो’ न राहता त्याचे सातत्य नंदिनी यांनी कायम ठेवावे, अशी जनतेची प्रतिक्रिया आहे.

Story img Loader