तालुक्यातील येसवडी चारीला कुकडीच्या चालू आवर्तनातून पाणी मिळावे यासाठी मनसेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली.
ांदोलकांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  सुपेकरवाडी, कुळधरण, पिपंळवाडी, कोपर्डी, धालवडी, तळवडी, बारडगांव व करमनवाडी या परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याची तीव्रता लक्षात घेऊन येसवडी तलावात कुकडीचे पाणी सोडणे गरजेचे आहे. येसवडी तलावात पाणी सोडल्यास दुष्काळाची तीव्रता काही प्रमाणात दूर होईल, त्यादृष्टीने कार्यवाही न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, राहूल निंबोरे, रविंद्र सुपेकर, सुरेश पोटरे, दिपक सांगळे, दत्ता शिपकुले, प्रवीण भोसे, बापू भवाळ आदी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा