महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे २६ फेब्रुवारीला परभणी दौऱ्यावर येणार असून, स्टेडियम मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची मनसेच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी दिली.
राज ठाकरे परभणीत दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत. सावली विश्रामगृहावर मुक्काम राहील. दि. २५ला हिंगोलीचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ते परभणीत येतील. दुसऱ्या दिवशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक घेऊन स्टेडियम मैदानावर ते सभा घेणार आहेत. सभेनंतर परभणीत त्यांचा मुक्काम असून दुसऱ्या दिवशी (दि. २७) सकाळी ९ वाजता ते बीडला रवाना होतील. सभेसाठी मनसेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. यानिमित्त गंगाखेड विभागाची बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विश्वास कऱ्हाळे, विनोद दुधगावकर, सचिन पाटील, रघुवीरसिंग टाक आदींची उपस्थिती होती.

Story img Loader