जिल्ह्यात अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्राप्त ३५ लाख ८३ हजारांचा निधी दीड वर्षांपूर्वी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झाला. मात्र, विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात, प्राप्त निधी सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कापड यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करण्याचे सुचविले. तसेच दारिद्रय़ रेषेखालील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार होता. गणवेशास लागणाऱ्या कपडय़ाची यंत्रमाग मंडळाकडे मागणीसुद्धा नोंदवली होती.

Story img Loader