खा. समीर भुजबळ आणि आपण नाशिक जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केल्याचे सांगतानाच नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी गोदावरीच्या गटारीकरणास मनसे जबाबदार असल्याचा आरोप केला. महापालिकेत सत्ता मिळून दोन वर्षांचा कालावधी झाल्यानंतरही ते गोदावरी नदीचे प्रदूषण रोखू शकलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
पंचवटीतील कोठारवाडी येथील प्रचार सभेत तसेच महालक्ष्मी थिएटरजवळील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालय उद्घाटनानंतर छगन भुजबळ बोलत होते. विरोधकांकडे प्रचारासाठी एकही विकास काम किंवा एकही मुद्दा नाही. त्यामुळे भुजबळ किती वाईट आहेत हे ते सांगतील. त्यावर तुमच्याकडे असलेला विकासाचा मजबूत ठेवा तुम्ही दाखवा. अतीआत्मविश्वास बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवीगाळ करून तुमचा विकास होणार नाही. उन्हाचे दिवस असल्यामुळे २४ तारखेला सकाळी लवकरात लवकर मतदान करून घ्या, असे आवाहनही भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. या वेळी भुजबळ यांनी विकास कामांचे अनेक दाखले दिले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा