महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने परत एकदा आपला ठसा उमटविला आहे. सलग पाच वर्षांपासून मनविसेच्या प्रतिनिधींचे आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर वर्चस्व राहिले आहे. या वर्षीही मनविसेचे तब्बल नऊ प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले आहेत.
विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये निखील पाटील, मंगेश वेरुळकर, ऋतुराज देशपांडे तर विद्यार्थी परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अध्यक्ष अरूण पाटील, उपाध्यक्ष पिंकल भारनवाला, विपीन आत्राम, सरचिटणीस मयुरी वालझाडे, सहचिटणीस जितेंद्र पचांगे, सचिन पाटील या सर्व सदस्यांचा सत्कार महापौर अॅड. यतिन वाघ व जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या राजगड या कार्यालयात करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक सुदाम बोडके, विजय ओहोळ, पराग शिंत्रे आदी उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर ‘मनविसे’चे वर्चस्व
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने परत एकदा आपला ठसा उमटविला आहे. सलग पाच वर्षांपासून मनविसेच्या प्रतिनिधींचे आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर वर्चस्व राहिले
First published on: 31-01-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns students sena lead on heath university students council