महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने परत एकदा आपला ठसा उमटविला आहे. सलग पाच वर्षांपासून मनविसेच्या प्रतिनिधींचे आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेवर वर्चस्व राहिले आहे. या वर्षीही मनविसेचे तब्बल नऊ प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले आहेत.
विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये निखील पाटील, मंगेश वेरुळकर, ऋतुराज देशपांडे तर विद्यार्थी परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अध्यक्ष अरूण पाटील, उपाध्यक्ष पिंकल भारनवाला, विपीन आत्राम, सरचिटणीस मयुरी वालझाडे, सहचिटणीस जितेंद्र पचांगे, सचिन पाटील या सर्व सदस्यांचा सत्कार महापौर अॅड. यतिन वाघ व जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या राजगड या कार्यालयात करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक सुदाम बोडके, विजय ओहोळ, पराग शिंत्रे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा