महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन तासांच्या धावत्या दौऱ्यात सरकारी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेत अडचणी ऐकून घेतल्या. मात्र, मोठय़ा संख्येने जमलेल्या मनसैनिकांना केवळ हात जोडून नमस्कार करत ते मार्गस्थ झाले. पदाधिकारी बैठकीत व बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोरही ठाकरेंनी मौन कायम ठेवले तरी त्यांची छबी पाहण्यास कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र दांडगा होता.
राज ठाकरे यांचे परळीमार्गे येथे मंगळवारी आगमन झाले. जागोजागी स्वागत स्वीकारत दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. ठाकरे येणार असल्याने विश्रामगृहातच शामियाना उभारला होता. येथे मोठी गर्दी झाली होती.
ठाकरे आपल्याशी बोलतील अशी सर्वाची अपेक्षा होती. मात्र, विश्रामगृहातील एकूण वातावरण पाहता ठाकरे यांनी थेट विधानसभेच्या ६ मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची ओळख बैठक घेतली व कार्यकर्त्यांशी बोलणे टाळले.  जिल्हाध्यक्ष अशोक तावरे, महेश चौधरी, गोविंद वनवे, महिला आघाडीच्या रेखा फड, राजू हंगरगे आदी उपस्थित होते.

Story img Loader