करमाळा तालक्यातील भाळवणी येथे एका १४ वर्षांच्या अल्पवयीन दलित शालेय मुलीचा शिक्षकांनीच विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करीत संबंधित शिक्षकांना तातडीने बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी ‘हलगीनाद’ आंदोलन केले.
सदर दलित मुलीचा शिक्षकांनी सामूहिक विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोषी शिक्षकांच्या बडतर्फीसाठी रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप-बहुजन महासंघ, बहुजन संघर्ष सेना, वंदे मातरम् संघटना, अहल्यादेवी होळकर संघटना आदी विविध संघटनांनी एकत्र येऊन ‘हलगीनाद’ आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. रिपाइंचे नागेश कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विवेक येवले, भारिप-बुहजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शहाजी ठोसर, तालुकाध्यक्ष बाबा घोडके, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, वंदे मातरम् संघटनेचे सुहास घोलप, अहल्यादेवी होळकर संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब टक्के यांचा या आंदोलनात प्रामुख्याने सहभाग होता.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा