मराठी आणि बंगाली चित्रपट हे आशयात्मकदृष्टय़ा दर्जेदार असतात. कितीतरी चांगले, वेगवेगळे विषय मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जातात, असे उद्गार जेव्हा वारंवार बॉलिवूडमधील प्रथितयश लोकांकडून ऐकू येतात, तेव्हा एकूणच चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांची दखल त्यांनाही घ्यावी लागते आहे हे निश्चितपणे
खरेतर, अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कॉर्पोरेशनने उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी उचलली आणि त्या चित्रपटाला यश मिळाले तेव्हापासूनच याची सुरूवात झाली होती. यापुढेही एखादी चांगली पटकथा असेल तर नक्कीच आपला त्यालाही पाठिंबा असेल, असे अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेस सांगितले होते. पण, तसा योग अजून तरी आलेला नाही. दरम्यानच्या काळात ‘नटरंग’, ‘बाबू बॅंड बाजा’, ‘जोगवा’, ‘चॅम्पियन’ अगदी यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ‘धग’ अशा अनेक मराठी चित्रपटांना मिळालेले यश बॉलिवुडच्या मंडळींनीही पाहिले. एकीकडे कितीही कोटींचे आकडे पार केले तरी हिंदी चित्रपटांच्या एकूणच दर्जाबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जाते. त्यामुळे हिंदीतही पैसा मिळवण्यासाठी तद्दन व्यावसायिक चित्रपट करायचे आणि मग छोटय़ा बजेटच्या पण चांगल्या आशयाच्या चित्रपटांना पाठिंबा द्यायचा हा सिलसिला तिथेही सुरू झाला. त्याचवेळी मराठी चित्रपटांचा एक चांगला पर्याय या मंडळींपुढे उभा राहिला. त्यासाठी पुढाकार घेतला तो रितेश देशमुखने. मूळ मराठी पण हिंदीतच अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवणारा रितेश हा एका अर्थाने दोन्हीकडचा दुवा झाला आहे. म्हणजे हिंदीतील लोकांना कोणी चांगला मराठी लेखक-दिग्दर्शक हवा असेल तर थेट रितेशकडे विचारणा केली जाते. रितेशने स्वत: रवी जाधव दिग्दर्शित ‘बीपी – बालक पालक’ चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे हातात घेतली. रितेशमुळे ‘बीपी’ हिंदीत अनेक कलाकारांपर्यंत पोहोचला. ‘बीपी’ला तिकीटबारीवर चांगलेच यश मिळाले आणि समीक्षकांनीही चित्रपटाला पसंती दिली.
त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमारनेही अश्विनी यार्दीबरोबर ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ बॅनरखाली मराठी चित्रपट निर्मिती करत असल्याचे जाहीर केले. अशोक व्हटकरांच्या ‘७२ मैल’ या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटाची निर्मिती अक्षयने केली आहे. आपण जे जे मराठी चित्रपट पाहिले ते आपल्याला खूप आवडले. त्याचवेळी अश्विनीने ‘७२ मैल’ कादंबरीची कथा त्याच्या कानावर घातली. ती अक्षयला आवडल्यानंतर या चित्रपटाच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू झाल्याचे अक्षय कुमारने सांगितले. ग्रेझिंग गोट निर्मित आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा