रंगीबेरंगी आणि वातानुकूलित मोनोरेल चेंबूर-वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असून आरंभी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत दर १५ मिनिटांनी मोनोरेलची फेरी होणार आहे. महिनाभरानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने मोनोरेलच्या सेवेचा कालावधी आणि फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. मोनोरेलमुळे चेंबूर ते वडाळा दरम्यानचा प्रवास अवघ्या १९ मिनिटांत होणार आहे. एरवी बसने हे अंतर कापण्यासाठी जवळपास ४० मिनिटे लागतात. मोनोरेलसाठी वडाळा येथे साडेसहा हेक्टर परिसरात कारडेपो उभारण्यात आला आहे. एकावेळी २१ मोनोरेल उभ्या राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर या डेपोमध्ये मोनोरेलचा नियंत्रण कक्ष, प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा आहेत. मोनोरेलमध्ये अत्याधुनिक ब्रेक लावल्यानंतर घर्षणातून तयार होणारी विद्युत शक्ती वापरण्याची सोय आहे. त्यामुळे सुमारे २५ टक्के विजेचा पुनर्वापर होणार आहे. त्याचबरोबर मोनोरेलच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक अशी व्यवस्था आहे.
मोनोरेल स्थानकांवरून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ‘बेस्ट’च्या बसची सुविधा असणार आहे. त्यासाठी ‘बेस्ट’ने या मार्गावर नव्याने फेऱ्या सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. मोनोरेल स्थानकांच्या परिसरात प्रवाशांची, वाहनांची वर्दळ सुलभ व्हावी यासाठी ‘सॅटिस’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. आणखी महिनाभरात ‘सॅटिस’ प्रकल्प कार्यान्वित होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले.
* भारताची पहिली मोनोरेल ही मुंबईतील चेंबूर-वडाळा-
संत गाडगेमहाराज चौक या मार्गावरील १९.१७ किलोमीटर लांबीची मोनोरेल आहे. तिचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा हा ८.९३ किलोमीटर लांबीचा असून तो आता सुरू होत आहे.
मोनोरेलची दर १५ मिनिटांनी फेरी
रंगीबेरंगी आणि वातानुकूलित मोनोरेल चेंबूर-वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-01-2014 at 06:32 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monorails every round after 15 minutes