पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींचा निषेध
पुणे येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याप्रकरणी येथील बंटी जहागीरदार याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींचा, तसेच बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिरापासून निघून मेनरोडवरून शिवाजी रोडमार्गे नेवासा रोडवरील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयावर नेण्यात आला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, शत्रुघ्न गव्हाणे, सदाशिव पटारे, विश्व हिंदू परिषदेचे विजय जयस्वाल, मनसेचे बाबा शिंदे, तिलक डुंगरवाल, बजरंग दलाचे कुणाल करंडे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी प्रकाश चित्ते, राजेंद्र देवकर, बाबा शिंदे, विजय जयस्वाल आदींची भाषणे झाली. यावेळी संजय पांडे, बबन मुठे, सचिन ढोबळे, मारुती बिंगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूरला हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
पुणे येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याप्रकरणी येथील बंटी जहागीरदार याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. या आरोपींचा, तसेच बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
First published on: 17-01-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha by hiduvadi assocations in shreeram pur