जिल्ह्यातील कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत. महादेव कोळी जातीचे दाखले मिळत नाहीत. या संदर्भातील जाचक अटी रद्द करून कोळी समाजास सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळावे, या मागण्यांसाठी अदिवासी कोळी अन्यायग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १८ मे रोजी काढलेले परिपत्रक रद्द करून कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, समाजावरील अन्याय दूर करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. शहरातील लेडीज क्लब येथून निघालेल्या मोर्चात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहर पोलीस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळामाग्रे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सिद्धेश्वर कोळी, जि. प. च्या माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी सदस्य व कोळी बांधवांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा