शहरातील हुडको वसाहतीमधील मैदानात होणाऱ्या बुद्ध विहाराची जागा बदलू नये, त्याच मैदानात बुद्ध विहार कायम ठेवावे, या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायी कार्यकर्त्यांनी विराट मोर्चा काढून डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ दोन तास धरणे आंदोलन केले. नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
हुडको वसाहतीतील बुद्ध विहाराच्या जागेपासून मोर्चाला सुरुवात झाली. निळे ध्वज व घोषणा तसेच मोटारसायकलची फेरी, घोषणा फलक, युवा व महिला कार्यकर्त्यांचा समावेश असे या मोर्चाचे स्वरूप होते.
डॉ.  आंबेडकर  पुतळ्याजवळ मोर्चा विसर्जित झाल्यानंतर तेथे धरणे धरण्यात आले. हुडकोच्या नियोजित जागेवर बुद्ध विहार कायम ठेवावे अशी आमची प्रमुख मागणी आहे.

Story img Loader