अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे खोटी ठरवत महादेव कोळी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर मोर्चा नेण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना भेटून पुन्हा एकदा निवेदन सादर करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाकडील १८ मे २०१३ रोजीच्या परिपत्रकानुसार कोळी समाजावर मोठा अन्याय होणार असून यात अनुसूचित जमातीचे असूनही महादेव कोळी समाजाला नाकारले जात आहे. त्यामुळे या समाजाच्या हजारो शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नोक ऱ्यांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोळी समाजासर मन्न्ोरवारलू व हलबा या प्रमुख जमातींनाच त्रास होत आहे.
या प्रश्नावर कोळी समाजाचा लढा चालूच असून त्याचा पुढचा टप्पा म्हणून सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या सहभागाने चार हुतात्मा पुतळ्यांपासून निघालेल्या या मोच्र्याचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, नागेश बिराजदार, पंचप्पा हुग्गे, अरुण लोणारी यांनी केले. शिवसेनेचे साईनाथ अभंगराव, अरुण कोळी, सुधाकर सुसलादी, गणेश कोळी, प्रा. अशोक निंबर्गी, कमल ढसाळ, भारती कोळी, शोभा कोळी, इंदुमती लिंबाळे, दादा करकंबकर, भीमाशंकर जमादार, सुरेखा कोळी, मल्लिाकार्जुन कोळी, विश्वनाथ कोळी, परगोंडप्पा हिप्परगी, सिद्धार्थ कोळी आदींचा या मोर्चात प्रामुख्याने सहभाग होता. काँग्रेस भवन येथे मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने यांनी मोर्चक ऱ्यांना सामोरे जात निवेदन स्वीकारले. कोळी समाजाच्या मागण्यांवर सहानुभूती दर्शवत याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा गेला असता तेथे पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. नंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केले.
महादेव कोळी समाजाच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यालयावर मोर्चा
अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे खोटी ठरवत महादेव कोळी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात सोलापूर जिल्हा महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर मोर्चा नेण्यात आला.
First published on: 07-07-2013 at 01:48 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha of mahadev koli community on ncp and congress office