कर्जत येथील प्रभारी तहसीलदार असलेले जैयसिंग भैसडे यांना जामखेड येथे त्यांच्या मूळ पदावर पाठवावे मागणीसाठी बुधवारी प्रांत कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा नंतर निषेध सभा व आराध्यांचा गोंधळही घालण्यात आला.
लोकशासन आंदोलन, वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटना व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. जाहीर सभेत बोलताना शब्बीरभाई पठाण यांनी प्रभारी तहसीलदार भैसडे यांच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका केली. त्यांचा येथील प्रभारी पदभार काढून त्यांना येथून मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यांची बदली न झाल्यास नगर-सोलापूर राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन व तालुका बंद करण्याचा इशारा पठाण यांनी यावेळी दिला. दादासाहेब सोनमाळी, नवनाथ तनपुरे, विजय शिंदे, यांच्यासह अनेकांची या वेळी भाषणे झाली. प्रांताधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना शिरस्तेदारांनी निवेदन स्वीकारले.
पठाण यांच्यासह नवनाथ तनपुरे, विजय शिंदे, जनाबाई कचरे, सरस्वती घोडेस्वार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. माजी उपसरंपच दादासाहेब सोनमाळी, ग्रामपंचायत सदस्य सचिन घुले, रवींद्र दामोदरे, बाबा भैलुमे, अर्जुन अनारसे आदी त्यात सहभागी झाले होते.

Story img Loader