औसा तालुक्यातील बेलकुंड येथे तीव्र पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल झाला. याचा अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्षांचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी बासनात गुंडाळून प्रस्ताव रखडवला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ उद्या (मंगळवारी) औसा पंचायत समितीवर घागर मोर्चा काढणार आहेत.
गेले दोन महिने उन्हाचे चटके सोसूनही अधिकारी काहीच दखल घेत नसल्याने वैतागलेले बेलकुंड ग्रामस्थ घागर मोर्चा काढणार असल्याचे गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विष्णू कोळी, अनंत िशदे, विलास तपासे, विजय बिराजदार आदी गावकरी या वेळी उपस्थित होते. साडेचार हजार लोकवस्तीच्या बेलकुंड गावात एकच िवधनविहीर सुरू आहे. हातपंप पूर्ण बंद आहेत.
गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.