धनगर समाजाला अनुसुचीत जातीच्या सर्व सवलती द्याव्यात व सहकारातील ओबीसी-एनटीचे आरक्षण रद्द करू नये यासाठी राज्यातील धनगरांचा नागपुर येथे विधीमंडळ आधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखालील या मोचात कर्जत तालुक्यातील धनवगर मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
अंगद रूपनर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सागितले, धनगर समाजाचा अनुसुचीत जातीत समावेश करावा अशी अनेक वर्षांंपासुनची मागणी आहे. देशात इतरत्र अशीच रचना आहे. महाराष्ट्रात मात्र या सवलती लागू करण्यात राज्यसरकार टाळाटाळ करीत आहे.     

Story img Loader