तालुक्यातील भीषण दुष्काळात प्रशासनाची निवारणाची कामे ठप्प असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चासमोर बोलताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका  केली.   
पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेद्र दळवी, तालुका प्रमुख बळीराम यादव, महिला अघाडी जिल्हाप्रमुख सुजाता कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अमृत लिगंडे, शब्बीर पठाण, संजय शेटे, महावीर बोरा आदी पदाधिकारी व शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
प्रांतधिकारी संदीप कोकडे मोर्चाला सामोरे आले, यावेळी बोलताना दळवी यांनी कर्जत तालुक्यात तिव्र पाणी टंचाई आहे. शहरात नळावाटे पाणी मिळत नाही, त्यासाठी कुकडीचे पाणी तात्काळ थेरवडी सह तालुक्यातील सर्व पाझर तलावात सोडण्यात यावे, तालुक्यातील अतिक्रमण विरोधी मोहिम थांबवावी आदी मागण्या केल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गुडांना पोसण्यासाठी छोवण्या देऊ नका असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
महिला अघाडीच्या प्रमुख सुजाता कदम यांचेही यावेळी भाषण झाले. तालुक्यातील अन्य सर्व राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांबरोबर फिक्सींग केल्याचा आरोप त्यांनी केला. गुलाब तनपुरे, बिभीषण गायकवाड, सुभाष जाधव, अतुल कानडे यांचीही यावेळी भाषणे झाली. कोकडे यांनी यावेळी बोलताना टँकरचे अधिकार तहसीलदारांना देऊ, कुकडीचे पाणी थेरवडी, दुरगांव तलावात सोडण्यात येणार आहे. अतिक्रमणे विरोधी मोहिम दुष्काळामुळे थांबवल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader