संयुक्त कृती समितीचा दावा
जिल्ह्य़ातील औद्योगिक परिसरातील ४५० पेक्षा अधिक कारखाने पुढील ४८ तास बंद राहतील. कामगार संघटनांनी एकजूट केल्यामुळे ३ लाख कर्मचारी संपात सहभागी होतील, असा दावा भारतीय ट्रेड युनियन व कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केला. बँक, विमा व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांनी ‘बंद’ ची हाक दिली असून उद्या (बुधवारी) ११ वाजता क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, पैठण औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी संपात सहभागी होणार असून बेरोजगारी, किमान वेतन, पेन्शन या अनुषंगाने विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.