अल्पवयीन मुलीला लघुसंदेश पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या चार संशयित तरुण आरोपींविरुद्ध रामनगर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर या मुलीच्या आईने या प्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना एक निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
२४ जानेवारी रोजी मुलीच्या आईने आपल्या मुलीला ठाकुर्ली, सारस्वत कॉलनी येथे राहणाऱ्या चार तरुणांनी अश्लील लघुसंदेश पाठविल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. १९ दिवस होऊनही पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याने मुलीच्या आईने याप्रकरणी गृहमंत्री, पोलीस महासंचालक, गृह सचिव आणि ठाणे पोलीस आयुक्तांना ही निवेदने दिली आहेत. ‘अल्पवयीन मुलीनेही या मुलांना लघुसंदेश पाठविले आहेत. ठाणे वृत्तान्तमधील बातमीवर, ‘या प्रकरणात पुरावाच सापडत नसल्याने आम्ही मुलांना कसे ताब्यात घ्यायचे’ अशी प्रतिक्रिया कल्याणचे पोलीस उपायुक्त पराग मणेर यांनी शुक्रवारी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा