भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण व जतन करण्याचे काम स्त्रियांना करायचे आहे. प्रत्येक घरातील आई आपल्या मुलीवर योग्य संस्कार करून संस्कृती रक्षणामध्ये महत्वाची ठरू शकते, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.
येथे सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रामतीर्थकर बोलत होत्या. यावेळी तामगावचे ठाणेदार ताठे, पोलिस उपनिरीक्षक बडगुजर, सिरसाट, वाचनालयाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सेवक, सरपंच कौसल्या पवार, माजी सरपंच उत्तमराव तायडे आदी उपस्थित होते. त म्हणाल्या, घराबाहेर वडिलांची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर घरात आईने मुलीला संस्कारित केले पाहिजे. आपली संस्कृती पुरुषप्रधान असली तरी ती टिकविण्याचे कार्य स्त्रियांना करावे लागते. पूर्वी स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करायच्या, पाणी भरायच्या, सर्वच कामे करायच्या. मात्र, घरात तक्रारी नव्हत्या. सध्या मात्र सोयी सुविध वाढल्या तशा तक्रारीही वाढल्या आहेत. एसएमएस आणि मिसकॉलचा हा भूलभूलैया जमाना आहे. यात मुलींनी वाहून न जाता स्वत: खंबीर राहावे. समाजात आपणाहून कोणाची बदनामी होईल, अशी कामे टाळली पाहिजे. यावेळी पुरुषोत्तम सेवक, आशिषकुमार चांडक, हिम्मतराव चोपडे, प्रकाश दवे, शिवकुमार चांडक अनंतराव क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवकुमार चांडक यांनी केले. संचालन भारत तायडे यांनी केले. आभार अनंत सातव यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा