मागील वर्षांत दखलपात्र गुन्ह्य़ात घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी केला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, इतरचोऱ्यांच्या गुन्ह्य़ात घट झाली असली, तरी जबरी चोरी, सोनसाखळी पळविणे, मोटारसायकल चोऱ्या, तसेच महिलाविषयक गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात तब्बल ४७ टक्क्य़ांनी वाढ झाल्याने पोलीस व नागरिकांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरला आहे.
मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त रासकर यांनी एका पत्रकार परिषदेत मागील वर्षभरात घडलेल्या गुन्ह्य़ांचा आढावा घेतला. २०११ वर्षांच्या तुलनेत मागील २०१२ वर्षांत दखलपात्र गुन्ह्य़ांच्या संख्येत शंभरने घट झाली आहे. २००१ मध्ये खुनाचे २२, खुनाचे प्रयत्नाचे २८, दरोडय़ाचे २५, घरफोडय़ांचे १७२ गुन्हे दाखल होते. तर सरत्या वर्षांत २०१२ मध्ये खुनाच्या गुन्ह्य़ात सातने तर खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्य़ात एकने घट झाली. दरोडय़ांच्या संख्येत तीनने घट झालीा तर घरफोडय़ांचे गुन्हे नऊ इतक्या संख्येने कमी झाले. सरत्या वर्षांत दाखल दरोडय़ांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९५.४५ टक्के असून तर घरफोडय़ांच्या गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ३१.२८ टक्के आहे.
तथापि, जबरी चोऱ्यांसह मोटारसायकल चोरी, रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. २०११ साली जबरी चोऱ्यांची संख्या ७४ एवढी होती. त्यापैकी ४१ गुन्हे उघडकीस आले होते. तर नुकत्याच सरलेल्या २०१२ वर्षांत या गुन्ह्य़ांची संख्या वाढून ती ९८ वर पोहोचली. त्यापैकी ५८ गुन्ह्य़ांचा छडा लावता आला. मागील वर्षांच्या तुलनेने जबरीचोऱ्या उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र ५५.४० टक्क्य़ांवरून ५१.०२ टक्क्य़ांपर्यंत खाली आले.
गेल्या वर्षभरात तब्बल ३३५ इतक्या मोटारसायकलींची चोरी झाली असून त्यापैकी केवळ ५५ मोटारसायकलींचा शोध घेता आला. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ १६.४१ टक्के आहे. २०११ साली शहरात २८८ मोटारसायकली चोरीला गेल्या होत्या. त्यापैकी ८९ मोटारसायकलींचा शोध लागला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात तब्बल ४७ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. मागील २०१२ वर्षांत मोटारसायकलींच्या चोऱ्या वाढल्या असून गुन्ह्य़ांचा शोध लागण्याचे प्रमाणही घटले आहे.
शहरात दंगलींचे प्रमाणही वाढले असून २०११ वर्षांत ९० दंगे झाले होते. तर २०१२ साली दंग्यांची संख्या १२० वर गेली. म्हणजे ही संख्या ३० ने वाढली आहे. सर्व चोऱ्यांच्या गुन्ह्य़ांची संख्या २०१२ वर्षांत ५५४ पर्यंत गेली होती. त्यापैकी केवळ १६७ चोऱ्या (२४.१८ टक्के) उघड होऊ शकल्या. २०११ वर्षांत अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांची दाखल संख्या तुलनेने कमी म्हणजे ५२० होती. त्यापैकी १५३ (२९.४२ टक्के) गुन्हे उघडकीस आले होते.
बलात्काराचे २५ गुन्हे २०१२ साली दाखल झाले होते. मात्र हे गुन्हे २०११ साली २२ एवढे दाखल होते. म्हणजे सरत्या वर्षांत या गुन्ह्य़ांमध्ये तीनने वाढ झाल्याचे दिसून येते. तर विनयभंगाच्या गुन्ह्य़ात मात्र घट झाली असून २०११ वर्षांत विनयभंगाचे दाखल गुन्हे ३१ होते, तर सरत्या वर्षांत या गुन्ह्य़ांची संख्या २९ वर खाली आली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात ४७ टक्क्य़ांनी वाढ
मागील वर्षांत दखलपात्र गुन्ह्य़ात घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी केला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, इतरचोऱ्यांच्या गुन्ह्य़ात घट झाली असली, तरी जबरी चोरी, सोनसाखळी पळविणे, मोटारसायकल चोऱ्या, तसेच महिलाविषयक गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्य़ात तब्बल ४७ टक्क्य़ांनी वाढ झाल्याने पोलीस व नागरिकांच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-01-2013 at 09:37 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorcycle robbery increased in solapur by 47 percent