सातारा जिल्ह्य़ातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जनमताचा रेटा वाढूनही टोल विरोधातील आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकतर्फी संपविल्याने जिल्हयातून संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा जिल्हयात गेले अनेक महिने महामार्गाची ठेकेदार कंपनी विराधात मोठे वातावरण आहे. जिल्हयातून जाणा-या महामार्गाची पूर्णत दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे काम निकृष्ट केल्याने रस्त्यावर हजारो खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले हातपाय व प्राण गमवावे लागले आहेत. अपघतात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकानी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्याच्या ठेकेदार कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महामार्गावरील कामाबांबत जिल्हयातील जनतेच्या मनात तीव्र संताप  आहे.
रस्त्याची दुरवस्था असूनही बेकायदेशीररीत्या टोल वसुली केली जात असल्याचा आक्षेप जनतेचा आहे. महामार्गाच्या दुरवस्थेवरुन व काम करत असताना ठेकेदार कंपनी दादागिरी करुन महामार्गालगतच्या गावक-यांशी वाद वाढवत असल्याने अनेक ठिकाणी जिल्हाभर छोटी-मोठी आंदोलने होत आहेत. त्याचा फायदा उठवत जिल्हयातील प्रमुख राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या पालकमंत्र्यांनी, खासदारांनी, जिल्हाध्यक्षांनी व सर्व आमदांरानी रिलायन्स कंपनीला व अधिकारी ठेकेदारांना धारेवर धरले. जोपयर्ंत रस्ते दुरुस्त होत नाहीत तो  पयर्ंत टोल आकारणी करु नये अशी भूमिका घेतली. ठेकेदार कंपनीला दम भरला.
ठेकेदार कंपनीशी साटेलाटे असल्याप्रमाणे ‘आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा ’ असे जनतेला दाखवत ठेकेदार कंपनीने वेळोवेळी काम करण्यासाठी वेळ मागून घेतली , पण काम सुरु केले नाही. रस्त्याची व वाहन चालकांची, प्रवाशांची दुर्दशा संपलीच नाही. नेत्यांकडून चच्रेचा फार्स करुन कंपनीला मुदतवाढ देण्यात येत होती. तरीही जनतेचे समाधान होत नसल्याने रविवारी आनेवाडी व तासवडे या टोल नाक्यावर राष्ट्रवादी कॉंग्रसने टोल बंदचे आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आंदोलनाकडे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर, प्रकाश गवळी आदी काही कार्यकत्रे वगळता सर्व आमदारांनी व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.  त्यामुळे या आंदोलनाचा सुरु होण्याआधीच फियास्को झाला. हे आंदोलन बारगळले आहे व यावरील टीका टाळण्यासाठी मंगळवारी पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले होते. मात्र या कामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात रिलायन्सच्या अधिका-यांची उद्या बठक बोलावली असल्याचे कारण देत हे आंदोलनच एकतर्फी स्थगित केल्याची घोषणा केली.
मंगळवारी महामार्गाच्या दुर्दशेबाबत तीव्र आंदोलन होण्याची शक्यता होती. मात्र आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याअभावी  राष्ट्रवादी कॉंग्रसने हे आंदोलन गुंडाळल्याने जिल्हाभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.