जायकवाडीला पाणी देण्याच्या आदेशाच्या निषेधार्थ प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन केले. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचा निषेध करीत बाभळेश्वर येथील चौकात नगर-मनमाड राज्यमार्ग अडवण्यात आला. लोणी पोलिसांनी २०० ते ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  
निळवंडे आणि भंडारदरा धरणांतून मराठवाडय़ाला पाणी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि निळवंडे धरणातून सोडलेले पाणी बंद करावे, अशी मागणी करीत दोन दिवसांपासून शेतकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम बेंद्रे, विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब कडू, संचालक काकासाहेब म्हस्के, ज्ञानदेव आहेर, राष्ट्रवादीचे राजेंद्र म्हस्के, उपसभापती सुभाष विखे, तान्हाजी बेंद्रे आदी आजच्या आंदोलनात सहभागी झाले होते.

Story img Loader